बाप्पांना फोन करून साकडं !

September 10, 2011 11:30 AM0 commentsViews: 1

10 सप्टेंबर

दर्शनाला जायला वेळ नसेल, तर काहीही हरकत नाही. कारण इंदूरचा चिंतामणी गणेश भक्तांसाठी सदैव तयार आहे. तुमची साधी तक्रारही अगदी चिठ्ठी किंवा पत्रातून गणेशाला पाठवायची आणि गणेशाचे पुजारी ती बाप्पाला वाचून दाखवतात. भक्तांचे प्रश्न देवाच्या कानावर घालतात. पण काळा प्रमाणे भक्तांकडे आता नवीन सुविधा आल्या आहेत. चिठ्ठी पाठवायला वेळ लागतो म्हणून भक्त मोबाईलवरुनचं गणपतीला साकडं घालतात. आता पर्यंत 3 लाखापेक्षा जास्त भक्तांनी पत्राद्वारे आपली समस्या या बाप्पांपर्यंत पोहोचवली आहे. तर दर दिवशी 300 पेक्षा जास्त भक्तगण मोबाईलच्या माध्यमातून गणपतीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे बाप्पांबरोबरच बाप्पांची श्रद्धासुद्धा आता हायटेक झालीे असं म्हणावं लागेल.

close