मिरजेत 100 वर्षाची प्रसिध्द गणेश विसर्जन मिरवणूक सुरू

September 11, 2011 12:59 PM0 commentsViews: 6

11 सप्टेंबर

सांगली येथे मिरजेत शंभर वर्षाची परंपरा असलेल्या प्रसिध्द गणेश विसर्जन मिरवणूकही दिमाखात निघाली. मिरजेतील एकूण 171 सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूतीर्ंच विसर्जन होणार आहे. ही मिरवणूक रात्रभर चालते. मिरवणूक पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असते. ढोल ताश्या, बँन्जो आणि लेझिम पथकाच्या गजरात गणरायाला निरोप दिला जातो. सुरक्षेसाठी शहरात जवळपास एक हजार पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

close