निवडणूक सुधारणासाठी टीम अण्णा मैदानात

September 10, 2011 2:03 PM0 commentsViews: 4

10 सप्टेंबर

जनलोकपालसाठी एकत्र आलेल्या टीम अण्णांची आता पुढची लढाई निवडणूक सुधारणा असणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून अण्णा हजारे पंतप्रधानांना पत्र लिहणार आहेत. खासदारांच्या कामाचा आढावा आणि त्या आधारे राईट टू रिकॉल यावर पंतप्रधानांचं काय मत आहे याची विचारणा या पत्रातून करण्यात येणार आहे.

याशिवाय भूसंपादन कायद्याचा पुनर्विचार व्हावा अशीही टीम अण्णांची मागणी आहे. पुढच्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी टीम अण्णांची राळेगणमध्ये बैठक सुरू आहे. त्यात हे निर्णय घेण्यात आले आहे. तर भूसंपादनात मोठा भ्रष्टाचार होतो. गावातल्या आणि शहरातल्या सर्व घटकांची मंजुरी मिळाल्याशिवाय भूसंपादन होऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली.

तसेच अरूणा रॉय यांच्या विधेकावरून काही विषयावर मतभेद आहे आम्ही त्यांना जाहीर आमंत्रण दिलं आहे त्यांची टीम आणि आमची टीम यावर चर्चा करण्यास तयार आहेत असं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, जनलोकपाल विधेयकावरुन पुन्हा फसवणूक केली तर जंतरमंतरवर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा अण्णांनी दिला. जनलोकपाल विधेयकाला विरोध करणार्‍या नेत्यांच्या घरांना घेराव घाला असं आवाहनसुद्धा अण्णा हजारेंनी केलं. तसेच असे नेते पुन्हा निवडून येऊ नयेत यासाठी निवडणूक सुधारणांची गरज असल्याचे अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.

जनतेच्या आंदोलनाची दिशा ठरवताना जनतेला विश्वासात घेण्याची गरज असल्याने बैठकीआधी पुढची दिशा काय असावी यावर टीम अण्णांनी आज राळेगणमध्ये जनतेच्या सुचना ऐकून घेतल्या यानंतर अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

close