जळगावमध्ये मिरवणुकीचा उत्साह शिगेला

September 11, 2011 3:16 PM0 commentsViews: 7

11 सप्टेंबर

जळगावमध्येही गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह बघायला मिळतोय. शहरातल्या मेहरुण तलावात गणेशमूतीर्ंचं विसर्जन केलं जातं आहे. महिंद्रा गणेश मंडळाचा गणपतीची बुलडोझरवर मिरवणूक निघाली. अशीच एक लक्ष वेधणारी मिरवणूक म्हणजे नटराज महिला मंडळाची गणेश मिरवणूक या मिरवणुकीतून मुलगी वाचवा हा संदेश दिला. काही मंडळांनी रस्त्यावर रचलेली पिरॅमिडची आरास तर काही ठिकाणी ढोल आणि लेझीम या परंपरागत वाद्यांच्या तालावर शाळकरी मुलांनी धरलेला ताल यामुळे मिरवणुकीची रंगत वाढल्याचं चित्र आहे.

close