आशियाई हॉकी स्पर्धेत पाकला धुळ चारत, भारत ‘चॅम्पियन’

September 11, 2011 3:43 PM0 commentsViews: 6

11 सप्टेंबर

पहिल्या वहिल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय टीमने बाजी मारली. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेत फायनलमध्ये भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-2 ने पराभव केला. निर्धारित वेळेत गोलची पाटी कोरीच राहिली. दोन्ही टीमनी गोलच्या काही सोप्या संधी वाया घालवल्या. एक्स्ट्रा टाईमध्येही गोल झाला नाही. त्यामुळे अखेर फायनल मॅच पेनल्टी शूटआऊटमध्ये गेली. आणि इथं चार गोल करत भारतीय टीम विजयी झाली. लंडन ऑलिम्पिकसाठी क्वालिफायिंग स्पर्धा भारताला आता खेळायचीय. त्यापूर्वी हा विजय मिळवल्यामुळे टीमचा उत्साह नक्कीच वाढेल.

close