कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

September 10, 2011 4:08 PM0 commentsViews: 2

10 सप्टेंबर

कांद्यावरची निर्यात बंदी ताबडतोब उठवावी अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना केली. कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी किमान निर्यात फॉर्म्युला लागू करा अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे केली. तशा प्रकारचं पत्रही त्यांनी केंद्र सरकारला लिहिलं. दरम्यान, कांदा निर्यातबंदी उठवत नाही तोपर्यंत जिल्हातील सर्व कांदा बाजार बंद असणार आहे. पिपंळगाव इथ सर्व बाजार संचालकांच्या बैठकती हा निर्णय घेण्यात आला. निर्यातबंदी हटवेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सर्व समित्यांमध्ये कांद्याचा लिलाव बंद राहणार आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज दुपारी सर्व बाजार समित्यांच्या संचालकांची बैठक झाली. आणि यात निर्यातबंदी मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

close