गुलबर्ग जळीतकांड प्रकरणी मोदींना दिलासा

September 12, 2011 10:28 AM0 commentsViews: 5

12 सप्टेंबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. गुलबर्ग जळीतकांड प्रकरणी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेची चौकशी करायची की नाही याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. पण सुप्रीम कोर्टाने एसआयटी (SIT) ला त्यांचा रिपोर्ट मॅजिस्ट्रेटला सादर करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी आता मॅजिस्ट्रेटचं निर्णय देणार आहेत. गुजरात दंगली दरम्यान गुलबर्गा भागात काँग्रेसचे खासदार एहसान जाफरी यांची हत्या झाली होती. एसआयटीनं सादर केलेल्या रिपोर्टमध्ये आपल्याकडे मोदींविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचं म्हटलंय. एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी, यांनी मात्र कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीे. पण आपला लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

- एसआयटीला रिपोर्ट मॅजिस्ट्रेटकडे सादर करण्याचे आदेश- याप्रकरणी आता मॅजिस्ट्रेट निर्णय- काँग्रेसचे खासदार एहसान जाफरी यांची- याप्रकरणी एसआयटीनं फेब्रुवारीमध्ये रिपार्ट- मोदींवर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत

close