डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्यसेवा आजारी ; तिढा कायम

September 10, 2011 4:18 PM0 commentsViews: 5

10 सप्टेंबर

सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी केलेला संपाबाबत आज तोडगा निघाला नाही. या संपात आता राज्यभरातील निवासी डॉक्टर उतरले आहेत. आज मार्ड आणि मुंबई महापालिका अधिकार्‍यांची बैठक झाली. महापालिका प्रशासनाने निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलंय. पण लेखी आश्वासन देण्याची मागणी मार्डने केली. उद्या सकाळी साडे अकरा वाजता सरकारने मार्डच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली. वैद्यकीय शिक्षण संचालनालयच्या ऑफिसमध्ये ही बैठक होणार आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव यांनी आज सायन हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टरांची भेट घेतली. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याशी फोनवरुन चर्चा केली.

close