महानगरपालिका क्षेत्रात जकात पुन्हा सुरू

November 16, 2008 12:49 PM0 commentsViews: 10

16 नोव्हेंबर कोल्हापूरप्रताप नाईक राज्यातल्या 14 महानगरपालिका क्षेत्रात जकात पुन्हा सुरू झाली आहे. जकातीच्या बदल्यात सुरू केलेल्या उपकराला राज्यभरातल्या व्यापा-यांनी विरोध केला होता. त्यामुळे उपकरासंबंधी तोडगा निघेपर्यंत जकात सुरू करण्याचा निर्णय महापालिकांनी घेतला आहे. सरकारनं काल संध्याकाळी या संबंधीचा जी. आर. लागू केला आहे. दरम्यान उपकराचा पर्यायही खुला राहणार आहे.व्यापा-यांचा उपकराला वाढता विरोध पाहून, राज्य सरकारनं या प्रश्नावर तात्पुरती उपाययोजना केली आहे. राज्यातल्या 14 महापालिकांना पुन्हा जकात लागू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार काल मध्यरात्रीपासून अंमलबजावणीही सुरू झालीये. कोल्हापूर मनपान या संदर्भात काल तातडीची बैठक घेतली. जकात लागू करायला सुरुवात करण्यात आली.उपकराच्या विरोधात राज्यभरात व्यापा-यांनी आंदोलन उभारलं होतं. त्याचबरोबर अनेक पालिकांना जकात वसुली रद्द झाल्यामुळे आर्थिक फटकाही बसत होता. त्यामुळे राज्य सरकारने अखेर जी आर काढून , उपकरावर तोडगा निघेपर्यंत जकात वसुलीला परवानगी दिली आहे. त्यानंतर तातडीने झालेल्या अंमलबजावणीमुळे पालिका कर्मचारी, तसंच वाहनचालकांचीही तारांबळ उडाली.

close