ठाण्याच्या ब्रिटीशकालीन पुलाला बार्जची धडक

September 12, 2011 4:58 PM0 commentsViews: 7

12 सप्टेंबर

ठाणे आणि कळव्याला जोडणार्‍या ब्रिटीशकालीन कळवा ब्रिजला एक मोठी बार्ज धडकल्याने हा ब्रिज वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे या ब्रिजवरुन सध्या फक्त टू व्हिलरना वाहतुकीची परवानगी देण्यात आली. देवश्री नावाची बार्ज ठाण्याच्या कळवा खाडीत भरतीच्या वेळी अडकली आणि नंतर या बार्जनं ब्रिटीश कालीन कळवा ब्रिजला 4 ते 5 वेळा धडक दिली. त्यामुळे कळवा ब्रीजला हादरा बसला. हा ब्रीज ब्रिटीश कालीन असल्याने याआधीच या ब्रीजवरुन अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली होती. आणि आता या बार्जच्या धडकेनं हा ब्रीज अधिकचं धोकादायक बनला.

close