ओरिसाला पुराचा तडाखा ; 22 जणांचा मृत्यू

September 12, 2011 12:18 PM0 commentsViews: 5

12 सप्टेंबर

ओरिसाला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. या पुरात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 19 जिल्ह्यातल्या 2600 गावातल्या 14 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. कटक, पुरी, केंद्रपाडा, जयपूर आणि संबलपूर या जिल्ह्यांमधील नुकसान जास्त आहे. पण त्यांच्यापर्यंत अजून मदत पोचत नाही. जवळपास 60 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचा दावा ओरिसा सरकारने केला आहे. महानदी दुथडी भरून वाहतेय. हिराकूड धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यानं सखल भाग पाण्याखाली गेले आहेत.

close