उपायुक्त चंद्रशेखर रोकडेंना जामीन

September 12, 2011 6:27 PM0 commentsViews: 2

12 सप्टेंबर

मुंबई महापालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर रोकडे यांना जामीन मिळाला आहे. एक लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. आज मुंबई सेशन कोर्टाने 50 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. पण चंद्रशेखर रोकडे यांना पुढील 8 दिवस रोज सकाळी 11 ते दुपारी 2 या दरम्यान मंुबई ऍन्टी करप्शन ब्युरोच्या मुख्य कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. येत्या 26 सप्टेेंबरला ऍन्टीकरप्शन ब्युरो चंद्रशेखर रोकडेच्या चौकशीचा अहवाल कोर्टात सादर करणार आहे.

close