सनातन संस्थेवर बंदीची शक्यता

September 12, 2011 2:21 PM0 commentsViews: 2

12 सप्टेंबर

सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केंद्राच्या विचाराधीन आहे. महाराष्ट्र सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करतं आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला सनातन संस्था आणि तिच्या कारवायांसदर्भात अतिरिक्त माहिती मागितली आहे. याआशयाचे पत्र केंद्र सरकारकडून साधारण चार दिवसांपूर्वीच राज्य सरकारला मिळालेलं आहे. त्यावर राज्य सरकारकडून लवकरच आवश्यक ती माहिती केंद्राकडे पाठवली जाणार असल्याचे अशी माहिती आर. आर. पाटील यांनी दिली. कोणत्याही अतिरेकी संघटनांना सहन केलं जाणार नाही. तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडवणा-या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचंही आर.आर.पाटील यांनी सांगितले.

close