‘कॅश फॉर व्होट’ प्रकरणी कॅश भाजपनंच पुरवली जेठमलानींचा दावा

September 12, 2011 6:10 PM0 commentsViews: 4

12 सप्टेंबर

कॅश फॉर व्होटप्रकरणी वकील आणि भाजपचे खासदार राम जेठमलानी यांनी आज अमरसिंह यांचा बचाव केला. मनमोहन सिंग सरकार वाचवण्यासाठी खासदारांना देण्यात आलेले पैसे स्वतः भाजपनंच पुरवले असतील असा खळबळजनक दावा जेठमलानी यांनी केला. स्टींग ऑपरेशनसाठी आपणच हिरवा कंदील दाखवला होता असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीच कबूल केलंय. त्यामुळे पैसेसुद्धा भाजपकडूनच आले असतील या संशयाला जागा असल्याचे जेठमलानी म्हणाले. दरम्यान, अमरसिंह यांच्या जामीन याचिकेवर कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे.

close