नाशकात सलग पाचव्या दिवशीही कांद्यांचा लिलाव बंद

September 13, 2011 10:28 AM0 commentsViews:

13 सप्टेंबर

नाशिकमध्ये 5व्या दिवशी कांद्याचे लिलाव बंद आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्यातबंदीच्या विरोधात शेतकर्‍यांनी हे आंदोलन छेडलं आहे. निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत. कृषी आणि पणन मंत्र्यांनी नाशिकमध्ये जाऊन या आंदोलकांचे म्हणणं समजून घेतलं. मात्र निर्यातबंदी उठवण्याबाबत केंद्राशी चर्चा करतोय या आश्वासनापलीकडे काही ठोस तोडगा निघाला नाही. दरम्यान नाशिक जिल्हातल्या सर्व बाजार समितीचे संचालक उद्या दिल्लीला जाणार आहेत. कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यतेखाली हे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्याची भेट घेऊन कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी करणार आहे.

close