पुण्यात 27 तासांनंतर संपली गणपतीची मिरवणूक

September 12, 2011 4:54 PM0 commentsViews: 5

12 सप्टेंबर

पुण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक सत्तावीस तासांनंतर संपली. पारंपारिक ढोल ताश्यांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. काल सकाळी साडेदहाला मंडईपासून मिरवणूक सुरु झाली. संध्याकाळपर्यंत मानाच्या गणपतींचं विसर्जन झालं. आणि त्यानंतर रोषणाई असलेले मोठे गणपती मिरवणुकीत सामील झाले. विविध विषयांवरचे देखावे हे पुण्यातल्या मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य असतं. यावर्षीही मिरवणुकीत वेगवेगळे देखावे पहायला मिळालं. सगळ्यांचा लाडका दगडूशेठ गणपती रात्री साडेबाराच्या सुमारास मिरवणुकीत दाखल झाला. सकाळी सात वाजता त्याचं विसर्जन झालं. पुण्यामध्ये सर्वाधिक गणपतींचं मुठा नदीत विसर्जन होतं.

close