अखेर उपायुक्त चंद्रशेखर रोकडे निलंबित

September 13, 2011 10:56 AM0 commentsViews:

13 सप्टेंबर

अखेर मुंबई महापालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर रोकडेंना निलंबित करण्यात आलं आहे. एक लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. एका कंत्राटदाराचे बिल पास करून देण्यासाठी दहा लाख रूपायांची लाच रोकडेंनी मागितली होती. यातील पहिला 2 लाखांचा हप्ता रोकडेंनी घेतला होता. ठरल्याप्रमाणे दुसरा हप्ता घेण्यासाठी गेलेले रोकडे इन्कम टॅक्स विभागाच्या जाळ्यात 1 लाखांची लाच घेतांना रंगेहात पकडले गेले. काल त्यांनामुंबई सेशन कोर्टाने 50 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. पण चंद्रशेखर रोकडे यांना पुढील 8 दिवस रोज सकाळी 11 ते दुपारी 2 या दरम्यान मंुबई ऍन्टी करप्शन ब्युरोच्या मुख्य कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. येत्या 26 सप्टेेंबरला ऍन्टीकरप्शन ब्युरो चंद्रशेखर रोकडेच्या चौकशीचा अहवाल कोर्टात सादर करणार आहे.

close