युएस ओपन स्पर्धा जोको’विन’

September 13, 2011 11:15 AM0 commentsViews: 2

13 सप्टेंबर

युएस ओपन स्पर्धेला नवा विजेता मिळाला आहे. नोव्हाक जोकोविचनं यु एस ओपन स्पर्धा जिंकली आहे. जोकोविचने फायनलमध्ये स्पेनच्या राफेल नडालचा 6-2, 6-4, 6-7, 6-1 असा पराभव केला आहे. यंदाच्या वर्षातील जोकोविचचं हे तिसरं ग्रॅण्डस्लॅम ठरलं आहे. या विजयासहीत जोकोविचने जागतिक टेनिस क्रमवारीतील आपलं अव्वल स्थानही कायम राखलंय. या विजयासहीत जोकोविचने पराभवाचाही बदला घेतला. याच यु एस ओपन स्पर्धेत गेल्यावर्षी नडालने जोकोविचला पराभूत केलं होतं. जोकोविचने आज त्याची परतफेड केली.

close