रेड्डी बंधूंचा जामीन अर्ज फेटाळला

September 13, 2011 11:30 AM0 commentsViews: 3

13 सप्टेंबर

अवैध खाण उत्खनन प्रकरणी रेड्डी बंधूंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. या जामीन अर्जावरची पुढील सुनावणी आता 19 सप्टेंबरला होणार आहे. तोपर्यंत रेड्डी बंधू सीबीआयच्या कोठडीत असणार आहे. अर्जावर सुनावणी सुरू असताना रेड्डी बंधूंनी जामीन मिळाल्यास तपासात सहकार्य करू असं कोर्टात सांगितलं होतं मात्र कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे.रेड्डी बंधूंना 5 सप्टेंबरला येडियुरप्पा सरकारमधील मंत्री आणि भाजपचे आमदार जनार्दन रेड्डी आणि त्याचा मेहुणा श्रीनिवास रेड्डी यांना आज अटक करण्यात आली. आणि हैद्राबादमधल्या विशेष कोर्टाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी रेड्डींवर लोकायुक्तांनी ठपका ठेवला होता. आणि सुप्रीम कोर्टाने ताशेरेही ओढले होते.

close