काबूलवर तालिबानचा दहशतवादी हल्ला

September 13, 2011 12:27 PM0 commentsViews: 5

13 सप्टेंबर

अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. स्फोट आणि गोळीबारानं काबूल हादरलंय. अमेरिकन दूतावासाच्या दिशेने अतिरेकी रॉकेटचा हल्ला करत आहे. दूतावासाजवळच्याच एका बिल्डिंगमधून ही फायरींग सुरू असल्याची माहिती अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या अधिकार्‍यांनी दिली. दहशतवादी अजूनही या बिल्डिंगमध्ये लपून बसले आहेत. हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली आहे.

close