लाल मातीचा बादशहा हरपला

September 14, 2011 11:57 AM0 commentsViews: 7

14 सप्टेंबर

भारतीय कुस्तीचे आधारस्तंभ असणारे हिंदकेसरी हरीश्चंद्र बिराजदार यांचं आज दिर्घआजारानं निधन झालं. पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दादोजी कोेंडदेव पुरस्कार आणि 2006 साली ध्यानचंद पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. त्यांचं पार्थिव गोकूळ वस्ताद तालमीत 6 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

लातूर जवळच्या त्यांच्या मूळ गावी उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत लाल मातीचा बादशहा असं बिरुद मिरवणार्‍या बिराजदारांनी ज्या तडफेनं मैदानं गाजवलं तितक्याचं ताकदीनं नव्या दमाचे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूही घडवले. गोकुळ वस्ताद तालीम म्हणजे कुस्तीची जणू पंढरीच बनली. बिराजदार यांच्या तालमीत ज्या ज्या खेळाडूंनी येथे सराव केला त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचावले.

पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेतील सात गोल्ड मेडल विजेत्या खेळाडूंपैकी 2 खेळाडू गोकूळ तालमिचे होते. सध्या आंतराराष्ट्रीय मैदान गाजवत असलेला राहुल आवारे हा बिराजदार यांचाच शिष्य. बिराजदार यांनी 1969 साली हिंदकेसरी किताब पटकावला. तर 1972 साली त्यांनी रुस्तमे हिंदचं मैदान मारलं. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र सरकारनं त्यांना 1971 साली प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवलं होतं.

close