हॉकी टीमची थट्टा ; हॉकी इंडियाचे बक्षीस नाकारलं

September 14, 2011 12:05 PM0 commentsViews: 1

14 सप्टेंबर

चीनमध्ये पहिली वहिली आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार्‍या भारतीय हॉकी टीमची घोर निराशा झाली. विजेत्या टीमच्या प्रत्येक खेळाडूला हॉकी इंडियाने फक्त 25 हजार रूपये देऊन त्यांचा अपमानच केला. टीमनं दिलेली ही रक्कम नाकारली आहे. चांगली कामगिरी केलेल्या टीमला अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची प्रतिक्रिया टीमचा कॅप्टन राजपाल सिंग यानं दिली. दरम्यान क्रीडामंत्री अजय माकन यांनी या प्रकारची गंभीर दखल घेतली. हा खेळाडूंचा अपमानच आहे हॉकी इंडियाने याबाबत आधी चर्चा करायला हवी होती, हे पैसे पुरस्काराच्या रकमेत जोडायला हवे होते असं मकान यांनी म्हटलंय. केद्रसरकारच्या वतीने भारतीय हॉकी टीमच्या प्रत्येक खेळाडूला दीड लाख रुपयांचं बक्षीसही त्यांनी जाहीर केलं.

close