पुण्यात डमरु फेस्टिव्हलचं आयोजन

September 13, 2011 1:11 PM0 commentsViews: 38

13 सप्टेंबर

वेगवेगळ्या प्रकारची संमेलनं आपण कायम पाहत असतो. पण पुण्यात मात्र एक आगळंवेगळं संमेलन भरणार आहे. हे संमेलन आहे तालवाद्यांचं. 'डमरु' या नावाचं तीन दिवसांचं फेस्टिव्हल पुण्यात आयोजित करण्यात आलं आहे. यात अनेक दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. 16, 17 आणि 18 सप्टेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे. पंडित विजय घाटे, तौफिक कुरेशी, सेल्वा गणेश शिवामणी असे अनेक दिग्गज कलाकार, पखवाज, तबला आणि ड्रम्स अशी जुगलबंदी पुणेकरांना इथं अनुभवायला मिळणार आहे. पुण्यात पहिल्यांदाच तालवाद्यांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील सगळे दिग्गज एकत्र येत असल्यानं संगीतप्रेमींसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे.

close