आंध्रप्रदेश सरकारचा नुकसान भरपाईचा निर्णय वादात

November 16, 2008 1:29 PM0 commentsViews: 5

16 नोव्हेंबर हैद्राबादशकील अहमद अलीहैद्राबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुस्लीम युवकांना हैद्राबाद कोर्टानं निर्दोष सोडलंय. यानंतर या निरपराध युवकांना नुकसान भरपाई देण्याचा आंध्रप्रदेश सरकारचा निर्णय आता वादाच्या भोव-यात सापडलाय. पण मुस्लीम संघटना आणि पोलीसी कारवाई झालेल्या युवकांनी ही नुकसान भरपाई स्वीकारण्यास नकार दिलाय.पीडित युवक सईद अली खान सांगतो, पोलिसांनी माझा छळ केला. मला ठिक ठिकाणी विजेचे शॉक देण्यात आले. ते सांगता येणेही कठीण आहे. गेल्या वर्षी इथल्या मक्का मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात हात असल्याच्या संशयावरून 24 वर्षीय सैयदला पोलिसांनी अटक केली. गेल्याच आठवड्यात हैद्राबाद कोर्टानं त्यापैकी 22 जणांची निर्दोष मुक्तता केली. सईद यापैकीच एक. याप्रकरणी पोलिसांनी 261 मुस्लीम तरुणांना अटक केली होती. त्यापैकी अनेकजणांना आता निर्दोष सोडून देण्यात आलंय. मात्र शारीरिक छळापेक्षा दहशतवादी असल्याचा ठपका सर्वात त्रासदायक असल्याचं सईदचं म्हणणं आहे.सैयद इमरान खान पीडित युवक सांगतो, मी कोर्ट आणि पोलिसांच्या विरोधात काहीही बोलणार नाही पण दहशतवादी असल्याचा माझ्यावरचा ठपका पुसून टाका. आंध्रप्रदेश सरकारनं आपली चूक मान्य करत या तरुणांना प्रत्येकी 30 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. या तरुणांच्या रोजगारासाठी राज्यसरकार खाजगी बॅकांकडून लोनही उपलब्ध करुन देणार आहे. पण तरूणांना झालेल्या मानसिक त्रासाच्या मानानं ही मदत कमी असल्याचं मुस्लीम संघटनांचं म्हणणं आहे. सरकारनं आता मदतीऐवजी सबसिडी देऊ केली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री मोहम्मद अली शबीर यांनी या नुकसान भरपाईच्या विषयावर प्रतिक्रीया देणं टाळलंय. दरम्यान मुस्लीम संघटनांनी या प्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी केली आहे.

close