मुंबई विमानतळावर हल्ल्याची शक्यता

September 13, 2011 5:02 PM0 commentsViews: 4

13 सप्टेंबर

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे. एअरपोर्टवरच्या छोट्या विमानांना अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर संस्थांनी दिला आहे. त्यामुळे एअरपोर्टवरची सुरक्षा कडक करण्यात आली. सीआयएसएफ (CISF)चे जवान आणि मुंबई पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर जुहू एअरपोर्टवरच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. हेलिकॉप्टर्स आणि छोट्या विमानांच्या सुरक्षेबाबत दक्ष राहण्याच्या सूचना पोलिसांना करण्यात आल्या आहेत. दरम्यान मुंबई एअरपोर्टवर हल्ल्याबाबत आयबीकडून ठोस माहिती मिळालेली नाही, फक्त ऍलर्ट्स आल्याची माहितीही आर.आर.पाटील यांनी दिली. त्यामुळे विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली. मुंबईत 13 जुलैला झालेल्या बॉम्बस्फोटात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेलं नाही. तसेच स्फोटाचा तपास एटीएसच करणार असल्याचं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केलं.

close