जाहिरातीत मराठी माणसांचा अपमान केला तर याद राखा – राज ठाकरे

September 14, 2011 6:10 PM0 commentsViews: 6

14 सप्टेंबर

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहिरातदारांवर संतापून जाहीर पत्राद्वारे इशारा दिला आहे. जाहिरातींमधून मराठी माणसांचा अपमान केला तर याद राखा असा दमच त्यांनी या पत्रातून दिला आहे. टाटा डोकोमोच्या एका जाहिरातीमध्ये एक मराठी स्त्रीला मोलकरीण दाखवण्यात आलंय. ती मोबाईल चोरते, असं दृष्य त्यात आहे. यावर राज ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. इंग्रजाळलेल्या क्रिएटिव्ह माणसांमध्ये मराठी माणसाबद्दल द्वेष असल्याचंही ते म्हणाले. हे पत्र म्हणजे शेवटचा इशारा असल्याचं त्यांनी या पत्रात म्हंटलं आहे. यापुढे तोंडी किंवा लेखी भाषा नाही तर क्रिएटिव्ह पद्धतीनं वागू असा टोलाही त्यांनी लगावला.

close