त्रिपुराचे राज्यपाल डी.वाय.पाटील चौकशीच्या घेर्‍यात

September 13, 2011 2:43 PM0 commentsViews: 4

13 सप्टेंबर

त्रिपुराचे राज्यपाल डी.वाय.पाटील यांची जमीन गैरव्यवहाराच्या आरोपावरुन चौकशी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या फरंदवाडी परिसरात पाटील यांच्या संस्थेची 37 एकर जमीन आहे. परंतु या जमिनीची खरेदी करतांना डी.वाय.पाटील यांनी गैरव्यवहार करुन आपली फसवणूक केल्याचा आरोप संपत पवार नावाच्या व्यक्तीन केला होता. तसेच पवार यांनी मावळ कोर्टात याचिकाही सादर केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी वडगाव मावळ कार्टाने वडगाव पोलिसांना सदर प्रकरणाची चौकशी करुन त्यामध्ये तथ्य आढळल्यास डी.वाय.पाटील, त्यांचे दोन मुल तसेच पत्नी आणि इतर चार ट्रस्टींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतू मावळ कोर्टाने दिलेल्या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी डी.वाय.पाटील यांनी पुणे सत्र न्यायालयाने फेरविचार याचिका दाखल केली होती. पण पुणे सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे दोन महिन्यापासून थांबलेला तपास आता पुन्हा सुरू होणार आहे.

close