अमेरिकेकडून मोदी, नितीशकुमार यांचे कौतुक

September 14, 2011 1:46 PM0 commentsViews: 6

14 सप्टेंबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी सद्भावनेसाठी उपवास करण्याची घोषणा केल्यावर त्याविषयीच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असानाच एका गोष्टीसाठी मोदींचे अमेरिकेकडून कौतुक झालंय. गुजरात हे भारतातीलं एक प्रगतीशील राज्य असल्याचे अमेरिकेच्या एका अहवालात म्हटलं आहे. मोदींनी चांगलं प्रशासन निर्माण केलं असून त्यांच्या कालावधीत गुजरातने चांगली प्रगती केली असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे याच मोदींना 2005 मध्ये अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला होता. मोदींसोबतच या रिपोर्टमध्ये नितीश कुमार यांचंही कौतुक करण्यात आलंय. जातीयवादी राजकारणातून बाहेर पडून नितीश यांनी व्यवस्थेला शिस्त लावल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तर मायावती यांनीही पायाभूत सुविधा आणि उत्तर प्रदेशातल्या ऊर्जा प्रश्नावर लक्ष दिल्याबद्दल त्यांचा उल्लेख या अमेरिकन अहवालात करण्यात आला. सध्या सुरू असलेला तेलंगणा प्रश्न, ममता बॅनजीर्ंनी बंगालमध्ये मिळवलेली सत्ता याचाही या काँग्रेशियल रिपोर्टमध्ये उल्लेख आहे.

close