सरकारी शाळांमध्ये बोगस विद्यार्थ्यांचा भरणा अधिक !

September 14, 2011 3:04 PM0 commentsViews: 4

14 सप्टेंबर

राज्यात सरकारी शाळांमध्ये शिकणार्‍या बोगस विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे सरकारी शाळांच्या योजना आणि सवलतींमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहे. या प्रकाराची चौकशी करायला खुद्द राज्याचे मुख्य सचिव नांदेडला गेले, तिथे त्यांना एकट्या नांदेड जिल्ह्यात 1 लाख 35 हजार बोगस विद्यार्थी हजेरी पटावर आढळून आले. त्यामुळे आता राज्य सरकारने राज्यातल्या सर्व शाळांची एकाच दिवशी पट तपासणी म्हणजेच इन्सपेक्शन करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

close