पुण्यात पोटनिवडणुकीत ‘पेड न्यूज’साठी समिती

September 13, 2011 4:55 PM0 commentsViews: 3

13 सप्टेंबर

पुण्यात खडकवासला पोटनिवडणुकीसाठी 6 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर या दरम्यान आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर 13 ऑक्टोबरला मतदान होऊन 17 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. यंदा पहिल्यांदाच पेड न्यूजचा वापर टाळण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आचारसंहितेच्या काळात लक्ष्य ठेऊन काही आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास किंवा ती पेड न्यूज आहे की नाही हे स्वत:च ठरवणार आहे. यासाठीचे सर्वाधिकार समितीला देण्यात आलेले आहेत. समितीला लागलीच कारवाई करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. त्यामुळे यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

close