दरोडेखोरांशी झालेल्या चकमकीत पोलीस जखमी

September 14, 2011 4:19 PM0 commentsViews: 1

14 सप्टेंबर

पुण्यात दरोडेखोरांशी झालेल्या चकमकीत काही लोकांसह पोलीसही जखमी झाले. पुणे-सातारा रस्त्यावरच्या रॉयल ऑर्केड बिल्डिंगमधील ही घटना आहे. या बिल्डिंगमध्ये दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी पाहीलं. त्यांना रोखयचा प्रयत्न करत असताना चोरांनी पोलिसांनाच बांबू आणि लोखंडी सळ्यांनी जबर मारहाण केली. यात जखमी झालेल्या तीन पोलीस आणि 1 व्यक्तिला सह्याद्री आणि राव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सहकारनगर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.

close