पोटनिवडणुकीत जागेसाठी आघाडीत रस्सीखेच

September 14, 2011 4:23 PM0 commentsViews: 1

14 सप्टेंबर

पुण्यातल्या खडकवासला विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या या जागेसाठी आता या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. मनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्या मृत्यूमुळे ही पोटनिवडणूक होतेय. रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा या सध्या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. राष्ट्रवादीने त्यांना तिकीट देण्याचे संकेत दिले आहेत. पण हर्षदा या सध्या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना आम्हीच तिकीट देवू असं काँग्रेसचं म्हणणं आहे. त्याबाबतचं पत्रही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे मधुकर पिचड यांना पाठवलं. 18 ऑक्टोंबरला ही पोटनिवडणूक होत आहे.

close