कांद्याप्रश्नी सर्वपक्षीय नेते आक्रमक

September 14, 2011 7:43 AM0 commentsViews: 1

14 सप्टेंबर

महाराष्ट्रात सध्या कांद्याचा वाद सुरु आहे. निर्यातीवरची बंदी उठवावी त्यासाठी सत्ताधारी पक्षांनीही आंदोलनं सुरु केली आहेत. नाशिकमध्ये गेले 2 दिवस राष्ट्रवादीचे खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ आंदोलन करत आहेत. तर काँग्रेसनंही आपल्या वर्चस्वाखालच्या मार्केट कमिट्यांची तातडीची बैठक बोलावली होती. वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांच्या खात्याने कांद्याची निर्यात रोखून धरली. आनंद शर्मा हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे हे प्रकरण काँग्रेसवर शेकवायचा राष्ट्रवादीचा आणि भुजबळांचा डाव दिसतोय. पण कांदा हे या वर्षातलं तिसरं असं पिक आहे. या अगोदर कापूस आणि साखर यांच्या निर्यात बंदीवरुन राष्ट्रवादीने काँग्रेसला लक्ष्य केलं होतंं. कांदा प्रकरणात हे पुन्हा एकदा दिसून येतं आहे.

close