आजीच्या आठवणीत हृतिकचं स्पीच थेरेपी सेंटर

November 16, 2008 3:25 PM0 commentsViews: 8

16 नोव्हेंबर, मुंबईरचना सकपाळबॉलिवुडच्या स्टार्सचं शेड्यूल तसं खूपच बिझी असतं. एखाद्या सिनेमाचं प्रमोशन, इंटरव्ह्यू, किंवा एखादी पेज थ्री पार्टी. जो-तो स्वत:ला लाईमलाईटमध्ये ठेवण्यासाठी धडपडत असतो. पण हृतिक रोशन याला अपवाद ठरलाय. नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यानं नुकतंच स्पीच थेरेपी सेंटरचं उद्घाटन केलं. हृतिकची आजी इरा रोशन यांच्या स्मरणार्थ हे स्पीच थेरेपी सेंटर उघडण्यात आलं आहे. यावेळी हृतिकनं स्वत: ही स्पीचथेरेपी अनुभवल्याचं सांगितलं.यावेळी बोलताना तो म्हणाला, ' माझ्या लहानपणी मी स्पीचथेरेपीनं उपचार घेतलेत. त्यासाठी मी खूप मेहनतही घेतली. माझ्या आजीलाही वयाच्या 80 व्या वर्षी स्पीचथेरेपी घ्यावी लागली. नंतर तिनं तर एक म्युझिक अल्बमही केला आणि म्हणूनच तिच्या स्मरणार्थ हे सेंटर उघडलंय. '

close