नितिन गडकरींचं घटणार ‘वजन’ !

September 14, 2011 5:01 PM0 commentsViews: 3

14 सप्टेंबर

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचं मंगळवारी मुंबईतल्या सैफी रूग्णालयात ऑपरेशन झालं. गॅस्ट्रीक बायपास सर्जरी असं या ऑपरेशनचं नाव आहे. शरीराची जाडी कमी करण्यासाठी हे ऑपरेशन केलं जातं. शरीरावरच्या अत्यंत अवघड अशा ऑपरेशन्समधील हे एक ऑपरेश्न मानलं जातं.

नितीन गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असून ऑपरेशन यशस्वीपणे पार पडल्याचे सैफी रूग्णालयातून आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही सांगण्यात आलं आहे. पेशंटच्या शरीरातला जाडेपणा हटवण्यासाठी जठराची रूंदी कमी करून हे ऑपरेशन केलं जातं. गडकरी यांना आणखी दोन ते तीन दिवस रूगण्यालयात रहावे लागेल असंही रूग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. सैफी रुग्णालयाचे नामांकित तज्ज्ञ डॉ.मुज्जफल लकडावाला यांनी हे ऑपरेशन केलं.

close