गॅस सिलेंडरची भाववाढ तुर्तास टळली

September 16, 2011 9:38 AM0 commentsViews: 34

16 सप्टेंबर

गॅस सिलेंडरची भाववाढ तुर्तास लांबणीवर पडली आहे. गॅस सिलेंडरच्या भाववाढीबाबत होणारी मंत्रिगटाची बैठक तिसर्‍यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. दरवर्षी प्रत्येक कार्डावर फक्त 4 एलपीजी (LPG) सिलेंडर देण्याचा प्रस्ताव आहे. त्यापेक्षा जास्त सिलेंडर घेतलं तर सबसिडी मिळणार नाही. म्हणजे वर्षातील पहिले 4 सिलेंडर प्रत्येकी 400 रुपयांना पडतील. आणि त्यापेक्षा जास्त सिलेंडर घेतल्यास सुमारे 710 रुपये मोजावे लागतील. असा प्रस्ताव होता.पण तुर्तासतरी यावरचा निर्णय पुढे गेला आहे.

close