प्रणव मुखर्जी साधणार थेट कांदा उत्पादकांशी संवाद

September 16, 2011 10:18 AM0 commentsViews: 6

16 सप्टेंबर

कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी थेट शेतकर्‍यांची मतं जाणून घेणार आहेत. एका कार्यक्रमानिमित्त उद्या प्रणव मुखर्जी मुंबईत येणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कांदा उत्पादक शेतकर्‍यांची मते प्रणव मुखर्जी जाणून घेणार आहेत.

तर कांद्याची बाजारपेठ बंद होऊन आज आठ दिवस झाले. शेतकर्‍यांकडील कांदा आता मोठ्या प्रमाणात सडायला लागला आहे. राज्यात 9 लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे. त्यात कालपासून नाशिक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान होतं आहे. मात्र निर्यातबंदी उठवण्याबाबत सरकारकडून कोणताच निर्णय होत नाही. नाशिक जिल्ह्यात 40 टक्के कांदा सडू लागला आहे. 78 कोटींचे व्यवहार ठप्प आहेत. कमी भावामुळे कांदा बाजारात आणता येत नाही आणि सडू लागल्यामुळे कांदा साठवताही येत नाहीय अशा कोंडीत आता कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे.

close