कोल्हापुरात भरलं श्लोक कलाप्रदार्शन

November 16, 2008 3:36 PM0 commentsViews: 2

16 नोव्हेंबर, कोल्हापूरस्वर्गीय जवाहरलाल दर्डा कला अकादमीच्या वतीनं कोल्हापुरात श्लोक कलाप्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष जयवंतराव आवळे यांनी केलं. यावेळी दुग्धविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, 'लोकमत'चे सरव्यवस्थापक प्रविण चोपडा उपस्थित होते. या कलाप्रदर्शनासाठी चारशेहुन अधिक कलाकृती आल्या होत्या. त्यापैकी निवडक 78 कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. यात अ‍ॅक्रॅलीक , तैलरंग, जलरंग, ग्राफीक्स यांचा समावेश आहे. हे प्रदर्शन पाहाण्यासाठी नागरीक मोठी गर्दी करत आहेत.

close