रस्त्यांच्या कामाची पाहणीसाठी मनसे एजन्सी नेमणार !

September 16, 2011 10:55 AM0 commentsViews: 2

16 सप्टेंबर

कल्याण-डोंबिवलीमधील स्टेअरकेस प्रिमियम बद्दल आयुक्तांनी योग्य तो कर लावावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. बिल्डरांनी यातून होणार्‍या फायद्यामधून या महापालिका क्षेत्रात रस्ते,सार्वजनिक बागा, फुटपाथ यासारखी कोणती कामे स्वखर्चानं करून देता येतील याचा आराखडा येत्या एक महिन्यात द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. आपण 16 ऑक्टोंबरला पुन्हा महापालिकेत येणार असून तेव्हा तो आराखडा आयुक्तांसमोर देण्यात येईल कल्याण डोंबिवलीमध्ये रस्त्यांची काम निट होतात की नाही हे पाहण्यासाठी मनसेकडून स्वतंत्र एजन्सी नेमण्यात येणार आहे. यात प्रतिष्ठीत नागरिक आणि रस्तेबांधणीतील तज्ञांचा समावेश असेल असंही त्यांनी सांगितलं.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण डोंबिवली महापालिकेत पोहचले आहेत. मी दर 3 महिन्यांनी माझ्या नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेईन असं जाहीर वचन पालिकेच्या निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांनी दिलं होतं. आणि त्यानुसार आजची त्यांची हि भेट आहे. आयुक्तांनीच स्टेअर केसवरचा कर कमी करण्याचा प्रस्ताव कल्याण डोंबिवलीच्या महासभेत आणला आहे. मनसेनं याला विरोध केला. याशिवाय कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांच्या अयक्षपदाबद्दलही राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिका-यांशी चर्चा केली. येत्या काही काळात या दोन्ही शहरांचे पदाधिकारी बदलण्याचे संकेत मिळत आहे.

close