बाय बाय द्रविड

September 16, 2011 5:40 PM0 commentsViews: 3

16 सप्टेंबर

भारत आणि इंग्लंडदरम्यानची शेवटची वन डे मॅच राहुल द्रविडसाठी यादगार ठरली. वन डे करियरमधली आपली शेवटची मॅच खेळणार्‍या द्रविडने 69 रन्सची शानदार खेळी केली. विराट कोहलीबरोबर त्यानं 170 रन्सची भक्कम पार्टनरशिप करत भारतीय इनिंग सावरली. यात कोहलीचा वाटा होता 100 रन्सचा तर द्रविडनंही शानदार हाफसेंच्युरी ठोकली. आपल्या या खेळीत द्रविडने 4 फोर मारले. द्रविडची खेळी ग्रॅमी स्वाननं संपवली. द्रविडने आऊट झाल्यावर इंग्लंडच्या खेळाडूंबरोबरच स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीही त्याला शुभेच्छा दिल्या. द्रविडने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी टेस्ट क्रिकेट मात्र तो खेळत राहणार आहे. राहुल द्रविड वन डेतही भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी आहे. 10 हजारपेक्षा जास्त रन करणार्‍या मोजक्या बॅट्समनमध्ये त्याची गणना होते. वन डेतही मिडल ऑर्डरचा कणा म्हणून त्याने नाव कमावलंय.

द्रविडची वन डे कामगिरीमॅच 344 रन्स -10889 बेस्ट -153 सेंच्युरी -12

close