बिनायक सेन यांच्या कार्यक्रमात अभाविपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

September 17, 2011 10:48 AM0 commentsViews:

17 सप्टेंबर

पुण्यात बिनायक सेन यांच्या कार्यक्रमात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. बिनायक सेन यांच्या दोन दिवसाच्या पुणे दौर्‍यादरम्यान पुण्याच्या आझम कँम्पमध्ये एक व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी बिनायक सेन यांच्या विरोधात काही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी 7 कार्यकर्त्यांना अटक केली. बिनायक सेन यांचा कोणताही कार्यक्रम पुण्यात होऊ दिला जाणार नाही असा इशारा अभाविपने अगोदरच दिला असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

close