कोल्हापुरात आयआरबीच्या विरोधात आंदोलन

September 17, 2011 12:39 PM0 commentsViews: 2

17 सप्टेंबर

कोल्हापूर शहरात आय.आर.बी कंपनीमार्फत 220 कोटींच्या रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. पण हे बांधकाम करत असताना रस्त्याखालील युटीलिटी लाईन्स शिफ्ट केलेल्या नाहीत. आणि याचाच फटका कोल्हापूरकरांना बसायला सुरवात झाली आहे. शहरातल्या संभाजीनगर ते आयसोलेशन हॉस्पिटल मार्गावर, रस्त्याखाली असणारी पाण्याची पाईप फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या प्रकारामुळे आय.आर.बीच्या कामाचे पितळ उघडं पडलंय. वारंवार होणार्‍या या घटनांमुळे संतापलेल्या नागरिकांनी एक अनोख आंदोलनं केलं. कॅामन मॅन संघटनेच्या कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी साचलेल्या पाण्यामध्ये खेळून आपला संताप व्यक्त केला. त्याचबरोबर आय.आर.बीच्या काराभाराविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

close