महागाई आटोक्यात आणण्यासाठीच रेपो रेटमध्ये वाढ – प्रणव मुखर्जी

September 17, 2011 1:07 PM0 commentsViews: 1

17 सप्टेंबर

भारतीय रिझर्व बँकेंने रेपो रेटमध्ये केलेली वाढ ही महागाई आटोक्यात आणण्यासाठीच केली असं मत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत महागाई आटोक्यात आणण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी मांडलं. ते मुंबईत बोलत होते. पेट्रोलचे दर वाढले असले तरी घरगुती गॅस, डिझेल आणि केरोसीनच्या दरवाढीबाबात सध्यातरी कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान पेट्रोलच्या दरवाढीसाठी एनडीए सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.