‘दिनकर संभाजी चव्हाण’ लवकरच हिंदी कलाकारांसह भेटीला

September 17, 2011 4:31 PM0 commentsViews: 9

17 सप्टेंबर

'दिनकर संभाजी चव्हाण…एक सामान्य माणूस' या सिनेमाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला. यावेळी बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव याने हजेरी लावली होती. जन्म या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक शिरीष राणे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. अभिनेता मनोज जोशी प्रथमच मराठी चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. सयाजी शिंदे, अरुण नलावडे, मोहन जोशी, विनय आपटे, के.उषा यांच्या यात भूमिका आहेत. या सिनेमात बॉलिवूडमधील चेहरे देखील बघायला मिळणार आहेत. सामान्य माणसाची असामान्य कहाणी यात दाखवण्यात आली आहे.

close