अडवाणींच्या रथयात्रेवर संघ नाराज ?

September 17, 2011 5:05 PM0 commentsViews: 6

17 सप्टेंबर

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेची घोषणा संघाला रुचलेली दिसत नाही. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार अडवाणींच्या रथयात्रेच्या घोषणेवर संघ परिवार नाराज आहे. आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही असं अडवाणींनी जाहीर करावे. तरच रथयात्रेला पाठिंबा देण्यावर विचार करु असं संघाने अडवाणींना कळवल्याचं समजतंय. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार गेल्या गुरुवारी नागपूरच्या संघ मुख्यालयात संघाच्या पाच वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यात अडवाणींच्या रथयात्रेच्या घोषणेवर नाराजी व्यक्त करण्यात आली.

close