पिंपरीत स्फोटकांसह व्यापार्‍याला अटक

September 18, 2011 5:48 PM0 commentsViews: 3

18 सप्टेंबर

मुंबई, दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाचे प्रकरण ताजे असतानाच आज सकाळी पुण्यात पिंपरी चिंचवड परिसरात पोलिसांनी गोपाल खत्री या व्यापार्‍याला अटक केली आहे. त्याला पुण्याच्या सत्र न्यायालयासमोर हजर केले असता 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहेत. गोपाल खर्त्री हा जुन्या चार चाकी गाड्यांच्या खरेदी विक्रीचा व्यापार करायचा. सकाळी पहाटे 4 वाजता गुन्हे शाखेच्या युनिट 1 नं ही कारवाई केली. पिंपरीतील काळेवाडी फाट्यावर त्याला अटक करण्यात आली त्यावेळी त्याच्या कारमध्ये 1 किलो अमोनियम नायट्रेट , दहा डिटोनेटर्स, आठ जिलेटीनच्या कांड्या, तीन देशी कट्टे आणि 8 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर आपले पती निर्दोष असून त्यांना स्थानिक नगरसेवक अमर मुलचंदानी आणि व्यापारी दिपक मेवानी हे खोट्या केसमध्ये फसवत असल्याचा आरोप गोपाल खत्रीच्या पत्नीनं केला.

close