मुंबई पालिकेचे कर्मचारी उद्यापासून संपावर

September 18, 2011 1:38 PM0 commentsViews: 2

18 सप्टेंबर

बृहनमुंबई महानगर पालिकेच्या कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी बीएमसीचे कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. कामगार नेते शरद राव यांनी या संपाची घोषणा केली आहे. उद्या रात्री नऊ वाजल्यापासून कामगार संपावर जाणार आहेत. या संपात 95 टक्के कर्मचारी सहभागी होतील, असा दावासुद्धा राव यांनी केला आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना टीबी झाला आहे यांचा भरणा काय आयुक्त सुबोधकुमार देणार आहेत का असा सवाल शरद राव यांनी उपस्थित केला. दरम्यान या संपाबाबत बीएमसी आयुक्त सुबोध कुमार यांच्याशी बोलणी करायला शरद राव यांनी स्पष्ट नकार दिला. अजित पवार किंवा उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करावी अशी मागणी त्यांनी केली.

close