महापौर मॅरेथॉन स्पर्धेत दीपचंद शरणची बाजी

September 18, 2011 1:52 PM0 commentsViews: 3

18 सप्टेंबर

वसई-विरारमध्ये आज पहिली वहिली राज्यस्तरीय महापौर मॅरेथॉन स्पर्धा रंगली. या मॅरेथॉनमध्ये राज्यभरातील जवळपास 5 हजार धावपटुंनी भाग घेतला. पुरूष गटात पुण्यातल्या दीपचंद शरण याने 42 किलोमिटर अंतर दोन तास 28 मिनिटात पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावला. वाशिमचा भास्कर कांबळे दुसर्‍या क्रमांकावर आला. त्याने हे अंतर 2तास 37 मिनिटात पार केलं. तर चंद्रपूरच्या निलेश बोंडेनं तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात किरण तिवारी हिनं पहिला क्रमांक पटकावला. तर स्पर्धेत ललिता बाबर दुसरी आणि संगीता यादव तिसरी आली. भारताची सुवर्णकन्या पी.टी.उषा या मॅरेथॉनची ब्रँड ऍम्बेसेडर आहे.

close