अमिताभ बच्चन यांनी घेतली अमरसिंगांची भेट

September 18, 2011 10:43 AM0 commentsViews: 6

18 सप्टेंबर

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आज एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन अमरसिंग यांच्या तब्येतीची विचारपूस केली. कॅश फॉर व्होटप्रकरणी अमरसिंग यांना तब्येतीच्या कारणावरून 19 तारखेपर्यंत जामीन मिळाला. अनेक वर्षांपासून मित्र असलेल्या अमिताभ यांनी अडचणीच्या काळात अमरसिंग यांच्याकडे पाठ फिरवल्याची टीका समाजवादी पक्षाच्या खासदार जयाप्रदा यांनी केली होती. त्यानंतर आज अमिताभ यांनी आपली मुलगी श्वेता नंदा हिच्या सोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन अमरसिंग यांची विचारपुस केली.

close