आग्य्रातील हॉस्पिटलमध्ये स्फोट अंतर्गत वादतून ?

September 18, 2011 11:32 AM0 commentsViews: 6

18 सप्टेंबर

आग्रा इथं काल शनिवारी जय हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटाचं नक्की कारण अजून समजू शकलेलं नाही. यात सहा जण जखमी झाले आहेत. त्यातल्या एका जखमीची प्रकृती गंभीर आहे. हॉस्पिटलच्या रिसेप्शनजवळ एका बॅगेत हा स्फोट झाल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान हा स्फोट अतिरेक्यांनी घडवला असेल असं म्हणणं घाईचं ठरेलं. यामागे दोन हॉस्पिटलमधील वादाची शक्यताही असू शकते असं उत्तरप्रदेश सरकारने केंद्राला कळवले आहे. या स्फोटाची तीव्रता कमी होती. त्यामुळे मोठी हानी झाली नाही. हा गावठी बॉम्ब असण्याची शक्यता आहे. पण तपासांनंतरच त्याबद्दल ठोस माहिती सांगितली जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे. एटीएस आणि फॉरेन्सिक टीम प्रकरणाचा तपास करतंय. तसेच एनएसजीचं पथकही तपास करण्यासाठी आग्रामध्ये दाखल झालं आहे. स्फोटानंतर हॉस्पिटलमधल्या रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.

close